आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:भूखंड चौकशीसाठी निवृत्त सनदी अधिकारी नेमणार

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या दहा गावांतील शासकीय व महापालिका मालकीच्या जमिनीची परस्पर विक्री करण्यात आल्याची तक्रार झाल्यावर या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आता या प्रकरणी चौकशीसाठी सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला आहे.

हद्दवाढीतील गावात असलेल्या शासकीय भूखंडाची परस्पर विक्री करून रजिस्टरमध्ये खाडाखोड करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी स्थायी समितीचे माजी सभापती संजय जाधव यांनी केली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली. या समितीची बैठक वेळेवर होत नसल्याने नगरसेवक संजय जाधव यांनी लक्षात आणून दिले होते.

बातम्या आणखी आहेत...