आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅलीचे आयोजन:निवृत्त सैनिकांचे‎ जल्लोषात स्वागत‎

खेडदिगर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या‎ अंबापूर येथील जवानाचे गावात‎ जल्लोषात स्वागत करण्यात आले.‎ ग्रामस्थांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात‎ आले.‎ अंबापूर येथील महेंद्र बच्चन‎ पावरा यांनी २१ वर्ष ७ महिने ४‎ दिवस देशाच्या सीमेवर सेवा‎ केल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले.‎ त्यानिमित्ताने आंबापूर येथे मोठ्या‎ जल्लोषात सेवापूर्तीचा कार्यक्रम‎ झाला. संपूर्ण गावातील लोकांनी‎ "भारत माता की जय’ च्या घोषणा‎ देऊन रॅलीचे आयोजन करण्यात‎ आले होते.

या प्रसंगी जवान महेंद्र‎ पावरा म्हणाले, देशसेवा करणे ही‎ एक संधी आहे. जसे जवान सीमेवर‎ देशसेवा करतात तसे देशातील‎ प्रत्येक नागरिकाने संविधानाच्या‎ नियमाचे पालन करत आपले कर्तव्य‎ देशसेवा म्हणून निभावले पाहिजे. या‎ वेळी गावकऱ्यांनी जवान महेंद्र‎ पावरा यांच्या कुटुंबीयांचा देखील‎ सत्कार केला. प्रसंगी सर्व ज्येष्ठ‎ नागरिक, सरपंच, पोलिस पाटील,‎ सामाजिक कार्यकर्ता, तरुण पिढी व‎ संपूर्ण गाव कार्यक्रमात सहभागी‎ होते. कार्यक्रम संपूर्ण गावातील‎ लोकांनी आयोजित केले. या‎ काऱ्यकमेचे सूत्रसंचालन पंकज‎ खर्डे यांनी केले तर आभार सरपंच‎ हसरत पटले यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...