आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाढीव वीज देयके रद्द करून नवीन सुधारित वीज देयके द्या, अशी शिफारस करण्याच्या मागणीचे निवेदन वीज अभियंता हेमंत बनसोड यांना नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, विरोधी पक्षनेते व सर्व नगरसेवकांकडून शुक्रवारी देण्यात आले.
महावितरण मार्फत जुलै महिन्याचे दिलेले वीज देयक मोघम स्वरूपाचे व अन्यायकारक आहे. कारण जे लोक १५० रुपये रोजंदारीने मजुरीचे काम करून कुटुंबाचे पालनपोषण करतात आणि ज्यांच्या घरात दोन बल्ब, एक पंखा व साधारण असा वीज वापर असणाऱ्या कुटुंबांना हजार रुपयांपेक्षा जास्त अंदाजित रकमेचे वीज देयक देऊन आर्थिक व मानसिक त्रास दिला जात आहे. पाड्यांवर मीटर रीडिंग घेण्यासाठी कर्मचारी आलेच नाहीत तरीदेखील अंदाजे देयक देऊन वीज बिलाची रक्कम भरा, अन्यथा तुमचे वीज कनेक्शन बंद करण्यात येईल, अशा धमक्या दिल्या जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
एप्रिल महिन्याच्या वीज बिलाची रक्कम १ हजार ते ६७ हजार इतकी आकारली आहे. त्यामुळे मागील देयकाचा भरणा केल्यानंतर किती वीज वापर झाला त्याबाबत चौकशी करून नवीन वीज देयक देऊन गरिबांना न्याय मिळवून द्या तसेच समाधान होईपर्यंत वीज जोडणी खंडित करू नका, असेही नमूद केले आहे. निवेदनावर नगराध्यक्षा हेमलता पाटील, उपनगराध्यक्ष अयुब बलेसरिया, गटनेता आशिष मावची, विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, नगरसेवक गिरीश गावित, हारून खाटीक, आरिफ बलेसरिया आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. ,
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.