आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाया:रिक्षा चोरीचा भांडाफोडसह सराईत ठकबाज; चोरीतील संशयित ताब्यात

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात राजरोजपणे फिरणारी चोरीच्या गुन्ह्यातील रिक्षा, धुळे व जळगावमध्ये अनेकांना गंडवणारा सराईत ठकबाज अन् चोरीच्या गुन्ह्यात पसार असलेल्या संशयिताला एलसीबीने गजाआड केले आहे. एकाच दिवशी या तीन कारवाया करण्यात आल्या.देवपुरातील विटाभट्टी परिसरात राहणाऱ्या अब्दुल रहिम मजिद शेख (वय ३०) यांच्याकडे चोरीच्या गुन्ह्यातील रिक्षा असल्याने पथकाने शेखला ताब्यात घेत विचारणा केल्यावर त्याने कल्याण येथील सुभाष भोईर यांच्याकडून रिक्षा खरेदी केल्याचे सांगितले.

चौकशी केल्यावर त्याच्याकडून ७ रिक्षा जप्त करण्यात आल्या आहे. त्यांची एकत्रित किंमत पोलिसांनी साडेचार लाख रुपये आकारली आहे. दुसऱ्या घटनेत आग्रा रोडवर मदनलाल जमनालाल मिश्रा ( वय ८५) यांच्याकडून अंगठी बघण्यासाठी घेऊन ती लांबवण्यात आली हाेती.

याबाबत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी सराईत गुन्हेगार दिगंबर कौतिक न्हावी-मानकर (रा. असोदा रोड, मोहन टाॅकीज जवळ, जळगाव) याला पथकाने जेरबंद केले आहे. तसेच अंगठी जप्त केली. तिसऱ्या घटनेत चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला संशयित जगदीश अनिल पाटील (वय २२, रा. चिंचगाव ढंढाणे, ता. धुळे) याला एलसीबी पथकाने अटक केली. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी पथकाचे कौतुक केले.

संशयित मानकर आहे अनेक गुन्ह्यांचा धनी
संशयित मानकर याच्यावर भुसावळ व अमळनेर पोलिस ठाण्यात प्रत्येकी तीन तर शहरातील आझादनगर, साक्री, शहर, बुलडाणा, रावेर, जामनेर, पारोळा, चाळीसगाव येथील पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहे. रिक्षा चोरी प्रकरणतील उल्हासनगर पोलिस ठाण्यातील तीन गुन्ह्यांचाही उलगडा झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...