आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Dhule
  • Rise In Inflation; Protesting By Distributing Carrots After Forgetting Promises, Yuvasena Expresses Displeasure Over Central Government's Policies In The City | Marathi News

आंदोलन:महागाई वाढल्याने थाळीनाद; आश्वासनांचा विसर पडल्याने गाजरांचे वाटप करत निषेध, युवासेनेतर्फे शहरात केंद्र शासनाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनावश्यक वस्तूंचे दर रोज वाढता आहे. पेट्रोल ११७ रुपये तर डिझेल १०० रुपये प्रति लिटरवर गेेले. तसेच घरगुती गॅस सिलिंडरसाठी आता एक हजार रुपये मोजावे लागतात. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे काही दिवस दरवाढीला ब्रेक लागलेला होता. पण निवडणूक संपल्यावर चार-पाच दिवसांत पेट्रोल व डिझेलचे दर वाढले. सततच्या दरवाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात युवासेनेतर्फे रविवारी थाळी बचाव आंदोलन करण्यात आले. तसेच शासनाने दिलेले आश्वासन पूर्ण होत नसल्याने नागरिकांना गाजर वाटप करण्यात आले.

आंदोलनात युवासेनेचे सहसचिव पंकज गोरे, जिल्हाप्रमुख संदीप मुळीक, शहरप्रमुख जितेंद्र पाटील, युवती सेनेच्या शहरप्रमुख दक्षता पाटील, तालुकाप्रमुख कामिनी देसले, प्रियांका जोशी, ज्योती पुकळे, लीना भडक, गायत्री धोत्रे, दिव्या डेकळे, उपशहरप्रमुख भूषण पाटील, स्वप्निल सोनवणे, प्रेम सोनार, नीलेश चौधरी, मयूर सोंजे, सागर मोरे, दर्शन चौधरी, राहुल इथापे, पवन सरग, अमोल पटवारी, अंकित नेरकर, गोपी जडे, श्याम वानखेडे, अभिलेष फुलदेवरे, अक्षय पाटील, शुभम रणधीर, युवराज मराठे, प्रमोद कासार, राकेश सोनवणे, जयवंत गोरे, ज्ञानेश्वर देवरे, भावेश अहिरराव, तुषार सातपुते, दर्शन कंबायत, राकेश मराठे, संदीप सांगळे, योगेश वाघ आदी सहभागी झाले होते.

नागरिकांना पेढे, साखर वाटप
महागाई वाढत असल्याने केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यासाठी थाळी वाजवण्यात आली. तसेच पेढे-गाजर, साखर वाटप करून आंदोलन करण्यात आले. शहरातील शिवसेना भगवा चौक ते महाराणा प्रताप चौकापर्यंत थाळी वाजवत रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना गाजर वाटप करण्यात आले. या वेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...