आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:दत्त मंदिर, आयटीआयपर्यंतच्या रस्ता कामामुळे पावसाळ्यात त्रास टळेल

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देवपूर भागात भूमिगत गटारीचे काम सुरू आहे. त्यासाठी मुख्य व वसाहतीमधील रस्ते मध्यभागी खोदण्यात आले. त्यानंतर ते व्यवस्थित बुजवले गेले नाही. त्यातही आग्रारोडची सर्वाधिक दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील दत्त मंदिर ते आयटीआय, नवरंग जलकुंभासमोरील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे आहेत. आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येत आहे. याविषयाकडे दिव्य मराठीने वारंवार लक्ष वेधले.

दत्त मंदिर ते आयटीआय व नवरंग जलकुंभासमोरील रस्त्याची पूर्ण दुरवस्था झाली. नवरंग जलकुंभासमोर काही ठिकाणी रस्ता केवळ माती टाकून बुजवला आहे. त्यामुळे या रस्त्यावर विरुद्ध दिशेने वाहतूक सुरू असते. धोकेदायक वाहतुकीने काहींचा जीवही घेतला आहे. या रस्त्याविषयी ‘दिव्य मराठी’ने सातत्याने वृत्त प्रसिद्ध केले. राजकीय पक्षांनी आंदोलने केली. त्यानंतर अखेर आता दत्त मंदिर ते नवरंग जलकुंभापर्यंतच्या रस्त्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सुरू केले आहे. तब्बल आठ महिन्यांनंतर काम सुरू झाले आहे.

पाइपलाइन चौकात जोडल्यावर पुढे जाणार
आग्रारोडवर भूमिगत गटारीचे काम करताना पाइपलाइन दत्त मंदिर चौकातून एसएसव्हीपीएस महाविद्यालय चौकापर्यंत आली आहे. दुसरीकडून ती देवपूर बसस्थानकांकडून या चौकापर्यंत आणलेली आहे. दोन्ही पाइपलाइन जोडून ते सरळ महाविद्यालयाला लागून असलेल्या रस्त्याने कुंडाणे येथील सांडपाणी प्रकल्पापर्यंत नेण्यात येतील.

बारापत्थर, स्टेशन रोड, गल्ली क्रमांक ४ मध्ये खड्डे
खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजवण्यात येतील, असे मनपा प्रशासनाने जाहीर केले होते.मात्र, जून महिना सुरू झाला तरी खड्डे बुजवण्याचे काम सुरू झालेले नाही. पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेतर्फे निविदा काढण्यात येते. मात्र, यंदा प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले होते. काही रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम शिल्लक होते. हे काम महापालिकास्तरावर होणार होते. मात्र, अद्याप खड्डे बुजवणे सुरू झालेले नाही. बारापत्थर रोड, स्टेशन रोड, गल्ली नंबर चारमधील रस्त्यांवर खड्डे कायम आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर काम : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पावसाळ्याच्या तोंडावर या रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात केली आहे. हे काम आठवडाभरात पूर्ण होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...