आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य शिबिर:रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स; दोंडाईचात आज  आरोग्य शिबिर

दोंडाईचा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स व श्री सिद्धेश्वर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मेंदू व मणक्यांचा विकार शिबिर १२ जून रोजी सकाळी १० ते २ या वेळात दोंडाईचा शहरातील रोटरी आय हॉस्पिटल, रोटरी मार्ग येथे आयोजित करण्यात आले आहे.

न्यूरो सर्जन डॉ. अभिजित चंदनखेडे तपासणी करणार असून, रुग्णांची मेंदू व मणक्याचा सर्व प्रकारच्या तपासणी करून गरजू रुग्णांची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, अपघातानंतर तातडीच्या शस्त्रक्रिया, मेंदूच्या गाठी ( ब्रेन ट्यूमर) व कर्करोगाचे निदान त्यावरील शस्त्रक्रिया तसेच लहान मुलांमधील मेंदू विकारांची तपासणी व निदान करण्यात येईल, शिबिराचा लाभ घेण्याचे रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष राजेश माखिजा, सचिव अॅड. नितीन अयाचीत, प्रो. चेअरमन डॉ. राजेंद्र पाटील, को.प्रो. चेअरमन प्रवीण महाजन, रोटरी आय हॉस्पिटलचे चेअरमन राजेश मुणोत, सिद्धेश्वर हॉस्पिटलचे संचालक डॉ. जितेंद्र ठाकूर, डॉ. संजय संघवी, डॉ. नैनैश देसले उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...