आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोवीस तास गर्दी:एकवीरादेवी दर्शनासाठी चोवीस तास गर्दी

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील एकवीरादेवीच्या मंदिरात दोन दिवसांपासून दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आहे. मंदिर २४ तास खुले असून, नवमीला भाविकांची दर्शनासाठी अलाेट गर्दी होती. मंदिरात उद्या बुधवारी विजयादशमीनिमित्त सीमाेल्लंघन होईल.

नवरात्राेत्सवाच्या पहिल्या दिवसापासून मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी हाेते आहे. सप्तमीपासून गर्दीत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. दर्शनासाठी भाविकांना किमान एक ते दीड तास रांगेत उभे राहावे लागते आहे. नऊ दिवसांत लाखाे रुपयांची उलाढाल झाली. नारळ, पूजा साहित्य, खाद्यपदार्थ विक्रीतून अनेकांना तात्पुरत्या स्वरूपात राेजगारांची संधी मिळाली. नवरात्रामुळे मंदिरात दिवसातून पाच वेळा आरती होते आहे.

त्यामुळे आरतीच्या वेळेस मंदिरात जास्त गर्दी असते. विजयादशमीनिमित्त मंदिरात उद्या बुधवारी सायंकाळी सीमाेल्लंघन हाेणार आहे. देवपूरसह शहरातील अनेक नागरीक सीमाेल्लंघनासाठी एकवीरादेवी मंदिरात येतात. त्यामुळे उद्या बुधवारीही मंदिरात गर्दी हाेईल. त्यामुळे नियोजन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...