आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:स्वयंसेवकांचा त्याग, बलिदानातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार, गौरीशंकर धुमाळ यांचे प्रतिपादन

शहादाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अवघ्या सतरा स्वयंसेवकांच्या उपस्थित निर्माण झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज सतरा कोटी स्वयंसेवकांचा जगातील सगळ्यात मोठे संघटन तयार झाले आहे. स्वयंसेवकांच्या त्याग आणि बलिदानातून संघाचा हा विस्तार झाल्याचे प्रा. गौरीशंकर धुमाळ यांनी गुढीपाडवा उत्सवात बोलताना केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शहादा शाखेतर्फे गुढीपाडवा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संघाचे तालुका संघचालक डाॅ. हेमंत सोनी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास कविवर्य बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. आर. एस. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्कृत भारतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. गौरीशंकर धुमाळ प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. प्रारंभी अन्नपूर्णा लाॅन येथून संघाचे सघोष पथसंचलन काढण्यात आले. या वेळी शहादा तालुका संघचालक डॉ. हेमंत सोनी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शहादा शहर व शहादा तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहीर केली. याप्रसंगी डॉ. कांतिलाल टाटिया, हिरालाल बोरदेकर, अजय शर्मा, माजी प्राचार्य सुनील सोमवंशी, रमेश शास्री, प्रा. पुष्कर शास्री, सतीश जोहरी, जयेश देसाई, शिवपाल जांगिड, संजय कासोदेकर, गोरख तांबोळी, दिनेश तांबोळी आदी उपस्थित होते.