आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठा सेवा संघ प्रणीत संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेतर्फे महात्माजी नगरात संत तुकाराम महाराज जयंती प्रत्यक्ष कलाकृतीतून साजरी करण्यात आली. यातून समाजप्रबोधन करण्यात आले. या वेळी प्रदेश अध्यक्षा प्रा. वैशाली पाटील या तुकारामांच्या भूमिकेत, तर यामिनी खैरनार संत जनाबाई, शारदा पाटील संत बहिणाबाईंच्या, आशा पाटील कान्होपात्रा, अर्चना पाटील रुख्मिणी, दीपाली बोरसे यांनी विठ्ठलाच्या भूमिकेतून प्रबोधन देखील केले. संत तुकाराम महाराज जयंती निमित्ताने प्रा. वैशाली पाटील यांनी अभिवाचनातून संत तुकाराम महाराज मांडले तर इतरांनी अभिनय सादर करून त्या काळातील युग साकारले.
या वेळी प्रा. वैशाली पाटील म्हणाल्या की, विठ्ठलाच्या भक्तिरसात स्वतःचे जीवन अनमोल बनवणारे संत तुकाराम हे वारकरी संत म्हणून ओळखले जातात. त्यांना वैयक्तिक व सामाजिक जीवनात इतके दुःखे आले की या जगात मला विठ्ठल सोडून कुणीही ओळखू शकत नाही, हे त्यांना जाणवायला लागले आणि तुकारामांनी गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत व इतर ग्रंथांचे वाचन केले. तसेच पंढरीच्या विठ्ठलाचे अखंड नामस्मरण करू लागल्याचे सांगितले. या वेळी प्रभात नगर मधील शीतल पाटील, वैष्णवी जाधव, स्मिता बागले, एकता मोरे, माधवी पाटील, चंद्रकला सांळुखे, दीपाली ठाकरे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.