आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त उद्या मंगळवारी (दि.७) सायंकाळी ७ वाजता आग्राराेडवरील केशव गार्डनमध्ये माता रमाई कला वैभव २०२३ या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. सैराट फेम नागराज मंजुळे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
खासदार डाॅ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, मुंबईचे संपादक बबन कांबळे, आमदार कुणाल पाटील, आमदार फारूक शह, नागपूरचे आमदार टेकचंद सावकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पाेलिस अधीक्षक संजय बारकुंड, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील, भाजपचे अनुप अग्रवाल आदी उपस्थित असतील.
नागसेन बाेरसे यांची उपमहापाैरपदी निवड झाल्याने त्यांचा नागराज मंजुळे यांच्या हस्ते सत्कार हाेणार आहे. तसेच न्यायदानात २५ वर्षांपासून कार्यरत अॅड. मधुकर भिसे यांचाही सत्कार केला जाईल. या कार्यक्रमापूर्वी सकाळी १० वाजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बुद्धवंदना, माता रमाई यांना अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष वाल्मीक दामाेदर, शशिकांत वाघ, राज चव्हाण, याेगेश ईशी, शंकर थाेरात यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.