आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक:साक्रीला ब्राह्मण समाज बांधवांच्या वतीने भगवान परशुराम जयंती साजरी

साक्री11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री शहरातील राम मंदिर येथे भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. ब्राम्हण समाजबांधवांकडून भगवान परशुराम यांची उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय दीक्षित हे होते. प्रमुख वक्ते डॉ. नीलेश माळीचकर हे होते. याप्रसंगी अॅड. नगरसेवक गजेंद्र भोसले, नगरसेविका उज्वला भोसले, अॅड. पुनम काकुस्ते, नगरसेविका जयश्री पगारिया, विनोदकुमार पगारिया, विजय भोसले, भाई भोसले, हेमंत भंडारी, निलेश कुलकर्णी, चंद्रात्रे सुनील जोशी, अनिल चंद्रात्रे, भट गुरुजी, मुकेश पिसोळकर, अरुण दीक्षित, सेच ब्राह्मण सभा महिला सदस्यही रोहिणी कुलकर्णी, मेघा पंडित, जया दीक्षित, संगीता रोहडे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी डॉ. नीलेश माळीचकर यांनी आपल्या वक्तृत्वात भगवान परशुरामांचा जीवनपट सादर केला. भगवान परशुराम यांनी समाजासाठी केलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली. भगवान परशुराम हे शूर योद्धा असून त्यांनी एकवीस वेळा पृथ्वी निशस्त्र केल्याचे त्यांनी नमूद केले.

याचबरोबर अॅड. पूनम काकुस्ते व विजय भोसले यांनी ही भगवान परशुराम यांच्या विषयी आपले विचार मांडले. येणाऱ्या कठीण काळात सकल हिंदू समाजाने एकत्रित येऊन संघर्ष करावा अशी भावना व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूसाहेब पाठक यांनी केले. त्यांनी भगवान परशुरामांच्या जीवनावरील माहिती दिली. सूत्रसंचालन प्रसाद पंडित यांनी केले. आभार ब्राह्मण सभेचे अध्यक्ष किशोर कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमासाठी तुळशीदास पांडे, मनोज रोहडे, भूषण रोहडे, सौरव कुलकर्णी, किशोर अग्निहोत्री, मनोज रावल ,किरण पंडित, परिक्षित कुलकर्णी आदींसह ब्राह्मण सभा सदस्य व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...