आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:साक्रीला पडणार नाही निधी कमी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे साक्रीतील पदाधिकाऱ्यांना आश्वासन

साक्री20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री नगरपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मतदारांना दिलेले आश्वासन पाळण्यासाठी कामे करणे आवश्यक आहे. साक्रीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या साक्री तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना दिले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली.

या वेळी पक्षाच्या सहकार आघाडीचे विभागीय संयोजक योगेश भामरे, आध्यात्मिक समन्वय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस राकेश अहिरराव, साक्री शहर सरचिटणीस पंकज हिरे आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी साक्री शहरातील विविध समस्यांवर चर्चा झाली. त्यात शहरातील अतिक्रमण नियमानुकूल करणे, घरकुल योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देणे, शहरात रोजगार निर्मिती करणे, भूमिगत गटारी करणे, रस्ते व शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी विविध विकास कामे करणे आदी विषयांचा समावेश होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहरातील प्रभाग क्रमांक ७, ९, ११, १२,१३ मध्ये पहिल्या टप्प्यातील कामासाठी सात कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शैलेंद्र आजगे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...