आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मारक:संभाजी महाराज यांचे स्मारक, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीसाठी निधी मिळावा

धुळे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्ह्यातील वडू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीच्या सुशोभिकरणासाठी निधी द्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

महाविकास आघाडी सरकारने वडू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी २६५ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला होता. मात्र, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला. छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीचे सुशोभिकरण करण्यासाठी १० कोटींचा निधी मंजूर झाला होता. तोही रद्द करण्यात आला आहे. एकीकडे सरकार हिंदुत्ववादी व शिवविचारांचे आहे असे दावे केले जात आहे. मग संभाजी महाराज स्मारक आणि शाहू महाराज समाधी स्थळ सुशोभिकरण का रद्द करण्यात आले असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

शिंदे सरकारने आघाडी सरकारचे अनेक चांगले विकास कामे मंजूर केली, ती रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी देण्यात आलेले २६५ कोटी रुपये व छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळासाठी दिलेले १० कोटी रुपये पुन्हा मंजूर करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष हेमंत भडक, महानगरप्रमुख श्याम निरगुडे, महानगर सचिव अमर फरताडे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नंदू अहिरराव, कार्याध्यक्ष सुनील ठाणगे, उपाध्यक्ष भूषण बागूल, मराठा सेवा संघाचे लहू पाटील आदींनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...