आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजनेला खिळ:धुळे, साक्री तालुक्यातील 21 पाणंद रस्त्यांना मंजुरी; सूचना नसल्याने खोळंबा

धुळे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे काम पूर्ण होणे आवश्यक

शेतशिवारात असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्ती आणि सक्षमीकरणासाठी मातोश्री ग्रामसमृध्दी पाणंद रस्ता आहे. या योजने अंतर्गत धुळे आणि साक्री तालुक्यात २१ रस्त्यांना जानेवारी महिन्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सहमती प्रदान करण्यात आली आहे. त्यानंतर तातडीने रस्ता कामे सुरू होणे आवश्यक होते. मात्र कामे कशी करावी, निधी कसा खर्च करावा या बाबत मार्गदर्शक सूचनांची तीन महिन्यापासून प्रतीक्षा लागून आहे. किमान पावसाळ्या पूर्वी काम सुरू झाले तर दिलासा मिळणार आहे.

पावसाळ्यात शेतशिवार रस्तामुळे शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन पाणंद रस्ता योजना हाती घेण्यात आली आहे. या योजने अंतर्गत लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार राज्याच्या रोजगार हमी विभागाने जिल्ह्यात जानेवारी २१ पाणंद रस्त्यांना मंजुरी दिली आहे. त्यात साक्री तालुक्यातील मैंदाणे, सुकापूर, पारगाव, काकसेवड येथील प्रत्येकी एक प्रमाणे चार तर आणि धुळे तालुक्यातील शिरुड, उभंड, शिरधाणे प्र.नेर, वडणे, गोताणे, नरव्हाळ, निमगुळ, बुरझड, खंडलाय खु., पिपंरखेडे, देऊर बु, गरताड,तरवाडे, सिताणे, फागणे, दह्याणे येथील रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

या नंतर ४ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी धुळे व साक्री पंचायत समितीच्या उपअभियंता यांना भौगोलीक परिस्थितीनुसार अंदाजपत्रके तयार करून कामे सुरु करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. मात्र त्यानंतर पाणंद रस्ते मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना देण्यात येणार होत्या. मात्र अद्याप या सूचनांचा अद्याप प्राप्त झाल्या नाहीत. परिणामी मंजूर कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. आता एक महिन्या नंतर पावसाळा सुरू होणार आहे. पावसाळ्यापूर्वी या पाणंद रस्त्यांचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. जेणे करुन शेतकऱ्यांना हंगामात या पाणंद रस्त्यांचा खऱ्या अर्थाने फायदा होईल.

ग्राम विकास मंत्रीकडे केली मागणी
धुळे तालुक्यातील शेत शिवार रस्ते प्रलंबित आहेत. या बाबत प्रसासकीय पातळीवर चालना देण्यात यावी, जेणे करून पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेत शिवारात जाण्यासाठी रस्ते खुले होतील. या बाबत तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस उपाध्यक्ष मुकुंद कोळवले यांनी ग्राम विकास मंत्री यांच्याकडे केली आहे.

कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाहीत
पाणंद रस्ता कामाना मंजुरी मिळाली आहे. तसेच अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना देखील उपअभियंता यांना दिल्या आहेत. मात्र अद्याप राज्य शासनाच्या कामा बाबत मार्गदर्शक सूचना नसल्याने काम सुरू झाल्या नाहीत.
संजय देवरे, कार्यकारी अभियंता, जिप

बातम्या आणखी आहेत...