आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियान:जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहीम, दोन वाहने भरून निघाला कचरा ; सीईओंनीही घेतला हातात झाडू, कार्यालय चकाचक

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत शनिवारी जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हातात झाडू घेत संपूर्ण इमारतीची स्वच्छता केली. अधिकारीच स्वच्छता करत असल्यामुळे कर्मचाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने स्वच्छता केली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषदेत हा उपक्रम राबवण्यात आला. स्वच्छता मोहिमेसाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी दिले होते. त्यानुसार स्वत: सीईओंसह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. जे. तडवी, महिला आणि बालकल्याण अधिकारी हेमंत भदाणे, पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांनी मोहिमेत सहभाग नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...