आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:संजय गांधी योजनेचे‎ 452 अर्ज केले मंजूर‎

शहादाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎ येथील तहसील कार्यालयात‎ तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी‎ यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी‎ निराधार समितीची बैठक घेण्यात‎ आली. त्यात एकूण ४५२ अर्ज मंजूर‎ करण्यात आले.‎ बैठकीला संजय गांधी निराधार‎ योजनेचे नायब तहसीलदार पी. सी.‎ धनगर, गटविकास अधिकारी राजेंद्र‎ घोरपडे, संजय गांधी योजनेचे‎ अव्वल कारकून आर. एल. कानडे,‎ इंदिरा गांधी योजनेचे ए. बी. महाले,‎ महसूल सहायक एच. डी. मुळकर,‎ समितीचे सदस्य ईश्वर मदन पाटील‎ आदी या वेळी उपस्थित होते.‎

बैठकीत इंदिरा गांधी राष्ट्रीय‎ वृद्धापकाळ योजना १४० अर्ज,‎ राष्ट्रीय विधवा निवृत्तीचे १६१, इंदिरा‎ गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती एक‎ आणि संजय गांधी निराधार योजनेचे‎ १२० तर श्रावण बाळ योजनेचे ४०‎ असे अर्ज या वेळी मंजूर करण्यात‎ आले असून काही प्रकरणात अपूर्ण‎ कागदपत्र असल्याने ते पूर्तते कामी‎ संबंधित सेतू कार्यालयांमध्ये‎ पाठवण्यात आले आहेत, अशी‎ माहिती या वेळी नायब तहसीलदार‎ पी. सी. धनगर यांनी दिली.‎ तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी‎ यांनी संजय गांधी निराधार योजनेत‎ संदर्भात असलेल्या कागदपत्रांची‎ पूर्तता करावी, अशा सूचना संबंधित‎ अधिकाऱ्यांना देऊन त्यांनी‎ मार्गदर्शन केले.‎

बातम्या आणखी आहेत...