आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोठडी:विदेशी चलन, भिशी अन् पसार संजयच्या; तपासासाठी सावकार बंबला पोलिस कोठडी

धुळे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध सावकारी प्रकरणातील संशयित राजेंद्र बंब अजूनही गुन्ह्यात सहकार्य करत नाही. त्याच्याकडे आढळून आलेल्या अनेक मुदत ठेवी (एफडी), विदेशी चलन, भिशीचे दस्तऐवज अन‌् पसार असलेला त्याचा भाऊ संजय बंब याची चौकशी करायची आहे. त्यामुळे राजेंद्र बंबच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी शनिवारी धुळे न्यायालयात करण्यात आली. त्यानुसार १४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

खासगी सावकारीमुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या राजेंद्र जीवनलाल बंब (वय ४९) याच्यावर आता पर्यंत चार गुन्हे दाखल झाले आहे. त्यापैकी पहिल्या मूळ तक्रारीत राजेंद्र बंब पोलिस कोठडीत आहे. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत शनिवारी संपली. त्यामुळे दुपारी बंब याला धुळे न्यायालयात उभे करण्यात आले. न्या एम. जी. चव्हाण यांच्या न्यायासनासमोर कामकाज सुरू झाले. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. पराग मधुकर पाटील यांनी तर बंब यांच्या बाजूने अॅड. मोहन भंडारी यांनी बाजू मांडली.

आता पुढे काय?
राजेंद्र बंब विरोधात मूळ तक्रारीनंतर आझाद नगर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे ( १२४/२०२२), (१२५ /२०२२) व धुळे शहर पोलिस ठाण्यात एक गुन्हा ( ३१२ /२०२२) दाखल आहे. या तीन गुन्ह्यांमध्ये बंब याला अटक होऊ शकते.

न्यायालयात दिले दस्ऐवज
संशयित राजेंद्र बंब चौकशीत सहकार्य करत नसल्यामुळे अनेक बाबींचा तपास राहिला आहे. त्यामुळे पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली आहे. त्या संदर्भातील काही दस्तएेवजही न्यायालयात सादर केले आहे.अॅड. पराग मधुकर पाटील, सरकारी वकील

बातम्या आणखी आहेत...