आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरा:सारंगखेडा यात्राेत्सव; पहिल्याच दिवशी दर्शनास एक किमी भाविकांच्या रांगा

सारंगखेडा/शहादा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे श्री दत्त प्रभूंच्या जयंतीनिमित्त दरवर्षी भरणाऱ्या यात्राेत्सवास यंदा बुधवारी प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी एक लाखापेक्षा जास्त भाविक भक्तांनी दर्शन घेतले. दरवर्षी १५ लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. मात्र यावर्षी २० लाखांपेक्षा अधिक भाविक भेट देतील, अशी माहिती दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अंबालाल पाटील यांनी दिली.

पहिल्याच दिवशी यात्रेत प्रचंड गर्दी पाहावयास मिळाली. दत्त प्रभूंच्या दर्शनासाठी एक लाखाहून अधिक पर्यटक, भाविकांची गर्दी ओसंडून वाहत होती. महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा लागल्या होत्या. श्री दत्त जयंतीदिनी पहाटे ३ वाजेपासून दर्शनासाठी भाविक येथे आले होते. तब्बल एक कि.मी.पेक्षा अधिक लांबीच्या रांगा लागल्या.

११ किलो केळीची तुला करत फेडला नवस
एकमुखी दत्त प्रभू हे नवसाला पावणारे दैवत म्हणून प्रसिद्ध आहेत. सारंगखेडा पंचक्रोशीसह देशभरातून भाविक, भक्त नवस फेडण्यासाठी सारंगखेडा येथे येतात. मुलाची प्रकृती सुधारावी, यासाठी जळगाव जिल्ह्यातील अशोक सोनवणे व त्यांची पत्नी अशा दोघांनी नवस मानला होता.

घोड्यांचा साज, साहित्य विक्रीतून माेठी उलाढाल
देशातील कानाकोपऱ्यातून घोड्यांचे साज साहित्य विक्री करणारे व्यावसायिक अनेक वर्षांपासून सारंगखेडा घोडे बाजारात येतात. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांतून १३ साहित्य विक्रते दाखल झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...