आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​घोड्यांचा साज विक्रीला सुरुवात:आजपासून सारंगखेडा यात्रोत्सव; 60 एकर जागेवर यात्रा; अवजड वाहतूकही वळवली

सारंगखेडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे श्री क्षेत्र एकमुखी दत्त प्रभू यांच्या जयंतीनिमित्त यात्रोत्सवाला बुधवारपासून सुरुवात होत आहे. यासाठी अवजड वाहतूकही वळवली आहे. ६० एकर जागेवर यात्रा भरत आहे. तापी नदीच्या किनाऱ्यावर १२ एकर जागेत टेंट सिटी बनवलेली आहेत त्यात देशातील पर्यटकांना राहण्याची व्यवस्था केली आहे. ६ एकर जागेत घोड्यांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र जागा करण्यात आली आहे. दि. ७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. तसेच हजारो भाविकांच्या साक्षीने महाआरती घेतली जाणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व चेतक फेस्टिव्हल सारंगखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०१८ साली यात्रेमध्ये दत्त प्रभूंच्या दर्शनासाठी १८ लाखाहून अधिक भाविक भक्तांनी व पर्यटकांनी भेट देण्याचा विक्रम केला होता. यंदा यात्रोत्सवासाठी मोठी गर्दी होणार असल्याने मंदिर ट्रस्टच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

श्री दत्त प्रभूंच्या दर्शनाची व्यवस्था एकमुखी श्री दत्त प्रभूंच्या दर्शनासाठी पूर्ण भारतातून पर्यटक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात त्या भाविक भक्तांच्या दर्शनासाठी महिला व पुरुष यांच्या वेगवेगळ्या दोन रांगांचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यासाठी पोलीस कर्मचारी व स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दत्त मंदिरावर २४ तास सीसीटीव्हीची नजर असणार आहे. एकमुखी दत्त मंदिर नयनरम्य व आकर्षक रोषणाईने सजावत केली गेली आहे. २० लाखाहून अधिक भाविक भेट घेतील, असे दत्त मंदिर ट्रस्टचे सचिव भिकन पाटील यांनी सांगितले.

३०० वर्षांहून अधिक जुनी मूर्ती एकमुखी दत्त प्रभूची मूर्ती पंचधातूने बनलेली आहे. सोने, चांदी, तांबे, पितळ, जस्त सारखे धांतूचा समावेश आहे. ३०० हुन अधिक वर्ष जुनी मूर्ती आहे. तीनशे हुन अधिक वर्षाचा इतिहास या मूर्तीशी जडलेला आहे. नवसाला पावणारा दत्त म्हणून प्रख्यात आहे. ही मूर्ती दगडी गाभाऱ्यात ठेवली आहे. ऐतिहासिक मंदिराचा ठेवा आहे. श्री चक्रधर स्वामी व श्री दत्त प्रभू यांच्या अष्ठांग भागाने पावन झाले आहे. मूर्तीचे नियमित अभिषेक केले जाते.

१४ पासून चेतक फेस्टिव्हल १४ डिसेंबरपासून ते १७ डिसेंबर दरम्यान पोल बेंडिंग, ऑब्स्टॅकल कोर्स, बॅरल रेसिंग, टेंट पेगिंग, बॉल अँड बकेट, हॉर्स जम्पिंग शो हॅक्स गेम असणार आहेत. तसेच १८ डिसेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान अश्व नृत्य स्पर्धा, काठीयावाडी अश्व सौंदर्य स्पर्धा, नुकरा अश्व सौंदर्य स्पर्धा, रेवाल अश्व शर्यत स्पर्धा, मारवाडी अश्व सौंदर्य स्पर्धा तसेच सारंगखेडा नच के दिखादे नृत्य स्पर्धा, मिस अँड मिसेस तनिष्का, राष्ट्रीय चित्र शिल्प स्पर्धा व प्रदर्शन सारख्या कौशल्यपूर्ण मजेदार स्पर्धांचे आयोजन चेतक फेस्टिव्हल च्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. यासाठी ६० बाय ७० चे स्टेज बनविले आहे.

बातम्या आणखी आहेत...