आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुळे तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींसाठी दाखल उमेदवारी अर्जांची सोमवारी तांत्रिक विद्यालयात छाननी झाली. सरपंचपदाचे तीन तर सदस्यपदाचे दहा अर्ज अवैध ठरले. चांदे येथे सरपंचाची बिनविरोध निवड झाली. पण अधिकृत घोषणा माघारीनंतर होईल. दरम्यान, साक्री तालुक्यातील चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.धुळे तालुक्यात सरपंचपदासाठी १८९ तर सदस्यपदासाठी १ हजार ११ अर्ज दाखल हाेते. त्यांची तहसीलदार गायत्री सैंदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली छाननी झाली. नगाव व इतर दाेन ग्रामपंचायतींसाठी इच्छुक उमेदवारांच्या अर्जावर विराेधकांनी हरकत घेतली.
सरपंचपदासाठी १८९ पैकी ३ तर सदस्यपदाचे १ हजार ४ अर्ज वैध तर ७ अर्ज अवैध ठरले. चांदे ग्रामपंचायत सरपंचपदासाठी एकच अर्ज असल्याने निवड बिनविराेध होणार आहे. छाननीसाठी श्रीकांत देसले, माधव ठाकरे, कोठावदे, समाधान शिंदे आदींनी प्रयत्न केले. साक्री तालुक्यातील ५५ पैकी ४ ग्रामपंचायतीत सरपंच व सदस्यांची बिनविराेध निवड झाली.
त्यात सुकापूर, माेहबंध, आमाेद, तामसवाडी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. वाकी येथे ९सदस्य बिनविराेध झाले. हरपाडा येथे ७ पैकी ६ सदस्य बिनविराेध झाले. एका जागेसाठी अर्ज नाही. शिंदखेड्यात सदस्यपदाचे १५ अर्ज बाद झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.