आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्किझोफ्रेनियाच्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधावर निम्स महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. वैशाली लोंढे यांनी संशोधन केले. त्यांच्या संशोधनामुळे औषध रुग्णाच्या रक्तातून मेंदूपर्यंत गेल्यावर त्याचा त्रास कमी होईल. या संशोधनाबद्दल त्यांना पेटंट मिळाले. प्रा. डॉ. सारिका वाईरकर यांनी भाजल्याची जखम व त्वचेवर वापरण्यात येणाऱ्या मुपिरोसीन या अँटिबायोटिक्सवर संशोधन करून पेटंट मिळवले आहे.
निम्स संस्थेच्या शोभाबेन प्रतापभाई पटेल स्कूल ऑफ फार्मसी अॅण्ड टेक्नाॅलॉजी मॅनेजमेंटच्या प्रा. डॉ. वैशाली लोंढे यांनी एसईआरबीच्या संशोधन अनुदानातून हायड्रोफिलिक मायक्रोनिडल्स विषयी संशोधनाचे कार्य हाती घेतले होते. प्रा. डॉ. लोंढे यांनी यांनी हायड्रोफिलिक मायक्रोनिडल्सचा शोध लावला. त्याच्या वापरामुळे स्किझोफ्रेनिया आजाराच्या रुग्णांना देण्यात येणारे इलोपेरिडोन हे औषध रक्तात आणि मेंदूपर्यंत गेल्यावर जास्त काळ तेथे राहण्यास मदत होईल.
प्रा. डॉ. वाईरकर यांचे संशोधन भाजल्यामुळे झालेल्या जखमा व त्वचेवर वापरण्यात येणाऱ्या मुपिरोसीन या अँटिबायोटिक्सशी संबंधित आहे. सद्य:स्थितीत ज्या पद्धतीने मुपिरोसीन वापरण्यात येते. ते योग्य पद्धतीने पसरत नाही. डॉ. वाईकर यांच्या संशोधनामुळे जखमेला स्पर्श न करता मुपिरोसीन वापरता येईल. हे फॉर्म्युलेशन गंभीर वेदना आणि गंभीर जखमांचे संक्रमण लक्षात घेऊन केले आहे.
यापूर्वी वेगवेगळ्या संशोधनाचे मिळाले तीन पेटंट
संशोधक प्रा. डॉ. वैशाली लोंढे यांच्या तीन संशोधनाला यापूर्वी पेटंट मिळाले आहे. त्यात ओरल सेमिसोलिड फॉर्म्युलेशन ऑफ मेटफॉर्मिन इन एक्स्टेंडेड रिलीज फॉर्म, इलोपेरिडोन ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी, अ नोवेल अॅण्ड स्टेबल कॉम्पोजिशन ऑफ प्युनिकलॅजिन्सची या संशोधनाचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.