आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिन्यासाेबत देवाच्या मूर्तीही चोरट्यांनी नेल्या चोरून:शिक्षकाच्या घरी चोरटयांची शाळा; दोन तासांत साडेसात लाख लंपास

धुळे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर परिसरातील चोरीचे स़त्र अजूनही थांबलेले नाही. याचा परिचय केले कॉलनीत राहणारे शिक्षक गणपत सोनवणे यांना आला. त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरटयांनी दोन तासांत तब्बल ७ लाख ६० हजारांचा ऐवज लांबवला. यात दागिन्यासाेबत देवाच्या मूर्ती यांचाही समावेश आहे. पश्चिम देवपूर पेालिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

देवपुरातील केले कॉलनीत प्लॉट न ३० या ठिकाणी माध्यमिक शिक्षक गणपत मारोती सोनवणे हे राहतात. सोनवणे कुटूंबिय घराला कुलूप लावून जेवणसाठी गेल्यावर चोरी झाली. तर जॅक या श्वानास पोलिसांनी दागिन्यांच्या पिशवीचा गंध दिला. त्याने समृध्दी नगरपर्यंत नेत माग दाखवला. त्यानंतर तो घुटमळला.

शिक्षकाच्या घरात चोरट्यांनी या दागिन्यांची केली चोरी
१८ ग्रॅमची पोत, ७ व ५ ग्रॅमचा सोन्याचा तुकडा, साडेचार ग्रॅमची अंगठी, १ ग्रॅम ७५० मिलीची अंगठी, अडीच ग्रॅमची अंगठी, ३ ग्रॅमची कर्णफुले, १० व ५ ग्रॅमची दोन पोत, ५ ग्रॅमची सोनसाखळी, ३० ग्रॅमचा राणीहार, १५ ग्रॅम वजनाची पदकासह पोत, ३ ग्रॅमची मंगलपोत, ५ ग्रॅमचा तुकडा, २ ग्रॅमचे पदक, १८ ग्रॅमची पदकासह पोत, १० ग्रॅमचा सोन्याचा वेढा, ९ ग्रॅमचा दागिना, ३० ग्रॅमची पोत, १ ग्रॅमच्या बाळया, ७ ग्रॅमचा शिक्का, ५० ग्रॅमच्या जुन्या सोन्याच्या पुतळा, १२० ग्रॅमची चांदीची लक्ष्मीमूर्ती, ६० ग्रॅमचा चांदीचा ठोकळा, ५०० ग्रॅमचे चांदीचे हात व पायातील कडे चोरीला गेले.

बातम्या आणखी आहेत...