आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:समाजाला अंधश्रद्धेतून मुक्त करण्याचे‎ विज्ञान महत्त्वाचे साधन ‎; एसपी बारकुंड‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विज्ञानाने प्रगती केली असली तरी ‎अनेक विद्यार्थ्यांना विज्ञान शिकणे आणि शिकवणे जिकिरीचे झाले‎ आहे. अंधश्रद्धेपासून मुक्ती मिळवण्याचा विज्ञान हा सर्वात‎ चांगला मार्ग आहे. त्यामुळे प्रत्येकाने ‎विज्ञानाची कास धरावी, असे‎ प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले.‎ शहरातील अल फातेमा उर्दू‎ शाळेत विज्ञान तंत्रज्ञान‎ प्रयोगशाळेचे उद्घाटन आणि‎ विज्ञान प्रदर्शन झाले. त्या वेळी ते‎ बोलत होते.

या वेळी सहायक‎ पोलिस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी,‎ शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे,‎ ‎मोहन देसले, महापालिकेचे प्रशासन‎ अधिकारी एम. जी. सोनवणे, एस.‎ बी. साळुंखे, आर. बी. पाटील,‎ संजय पवार आदी उपस्थित होते. या‎ वेळी शाळेतील एका विद्यार्थिनीने‎ मनोगत व्यक्त केले. पोलिस‎ अधीक्षक बारकुंड यांनी विद्यार्थ्यांनी‎ मांडलेले विज्ञान प्रदर्शनाची पाहणी‎ केली. या वेळी अल फातेमा उर्दू‎ हायस्कूल, कॉमन स्पोर्ट‌्स‎ एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर‎ सोसायटीचे शिक्षक उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...