आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:लहान बालकांच्या तपासण्या; जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या गरोदर मातांच्या समस्या

कापडणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानात होणाऱ्या गरोदर मातांचा व लहान बालकांच्या तपासण्या, पोषण आहार याबाबत धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी गरोदर मातांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये होत असलेल्या कॅम्पचा आढावा घेतला. गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कापडणेसह बोरीस, लामकानी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या. या वेळी सीईओ भुवनेश्वरी एस. यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले उपस्थित होते.

या वेळी कापडणे प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन त्यांनी गरोदर मातांची विचारपूस करत पोषण आहार, रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधांबाबत माहिती जाणून घेतली. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानात महिन्याच्या दर ९ तारखेला हा कॅम्प आयोजित केला जातो. यात शहरातील नामवंत स्त्रीरोगतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञ तपासणीला येत असतात. या वेळी कापडणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे व गरोदर मातांची माहिती घेऊन त्यांना प्रामाणिकपणे सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या कामाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कौतुक केले.

बोरीस, लामकानी आरोग्य केंद्रात पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बोरीस प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहणी केली. या वेळी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्यात रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. यात विविध आरोग्य विषयक जनजागृती करणाऱ्या रांगोळ्या टाकण्यात आल्या होत्या. यावेळी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व सरपंच सिंधूबाई माळी, उपसरपंच नारायण गिरासे, ग्रामपंचायत सदस्यांसह मनोज राजपूत आदी उपस्थित होते. लामकानी आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी बळीराम चव्हाण, डॉ. जिज्ञासा अहिरे, डॉ. राजश्री अहिरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...