आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नळ कनेक्शन कट:थकबाकी न भरणारे 5 दुकाने सील; 42नळ कनेक्शन कट

शहादा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत ४ कोटी १२ लाख १६ हजार ९१० रुपयांची वसुली

नगरपालिकेच्या वतीने थकीत कराच्या वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. महिनाभरात जवळपास दोन कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. थकबाकीदारांनी वेळेत कराचा भरणा करावा. जे कराचा भरणा करणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांनी दिली. तर आतापर्यंत ५ दुकाने सील व ४२ नळ कनेक्शन कट केली..

शहादा नगरपरिषदेतर्फे थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे विशेष म्हणजे कराची वसुली समाधानकारक न करणाऱ्या पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याचा इशारा नगरपालिका प्रशासनाने दिला आहे. त्या आशयाच्या नोटिसाही अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईचा इशारा दिल्यामुळे ही पथके घरोघरी, व्यावसायिकांच्या दुकानावर फिरून वसुली करीत आहेत. जवळपास १० कोटी १३ लाख ८२ हजार ११६ रुपये कराची थकबाकी आहे.

आतापर्यंत ४ कोटो १२ लाख १६ हजार ९१० रूपयांची वसुली केली आहे. दैनंदिन ४ ते ५ लाख रुपये सरासरी वसुली केली जात आहे; परंतु दैनंदिन किमान १० ते १२ लाख रुपयांची कर वसुली व्हावी, यासाठी वरिष्ठ अधिकारी पाठपुरावा करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...