आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:अरुण शुक्ल मृत्यूप्रकरणी मारेकऱ्याचा शोध घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करा

धुळे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवपुरातील प्रभात नगरजवळील निर्माणाधिन पुलाजवळ मृतदेह मिळून आलेल्या अरुण शुक्ल यांचा खून करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृत अरुण शुक्ल यांचे कुटुंबीय तसेच शेजारी यांनी केली आहे. या संदर्भात बुधवारी पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

देवपुरातील गल्ली क्रमांक ७ या ठिकाणी राहणारे अरुण नारायण शुक्ल हे २१ एप्रिल रोजी बेपत्ता झाले. कुटुंबीय, शेजारी, नातलगांनी त्यांचा रात्रभर शोध घेतला. शिवाय पोलिसांना देखील कळवण्यात आले होते. परंतु ते मिळून आले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह निर्माणाधिन पुलाखाली संशयास्पदरित्या आढळून आला होता. घटनेला सुमारे १५ दिवस उलटून देखील त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आलेे नाही. परंतु वस्तुस्थिती पाहता अरुण शुक्ल यांचा घातपात झाला आहे.

अज्ञात स्थळी नेऊन त्यांचा खून केला. यानंतर मृतदेह पुलाखाली आणून ठेवला, असा आरोप परिस्थितीवरुन कुटुंबीय व शेजारी यांनी केला आहे. शिवाय त्यांचा मृत्यूपासून मोबाईल व पॉकेट डायरी देखील गायब आहे. मारेकऱ्याने त्यांचा खून केल्यानंतर ते लांबवली असावी, अशी शंका आहे. पोलिसांनी या प्रकरणी सखाेल तपास करावा, अशी मागणी मृत अरुण शुक्ल यांचा मुलगा कुणाल, जावई सारंग कुलकर्णी व कुटूंबियांनी केली आहे. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, मनोज मोरे, सुरेश जैन, सुभाष मराठे, सुनिल चौधरी, मोहन मोरे, राजेंद्र देवरे, जितेश सूर्यवंशी, रामदास जगताप आदी उपस्थित होते.

चौकशीचे पोलिस अधीक्षकांनी दिले आदेश
अधीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी तक्रारींची गांभिर्याने दखल घेतली आहे. शिवाय आझाद नगर पोलिस ठाण्यात दाखल या घटनेची समांतर चौकशीचे आदेश दिले आहे. अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, एलसीबीचे निरीक्षक हेंमत पाटील हे या प्रकरणाची तपास करत आहे. तर आझाद नगर पोलिसांनाही गंभिर्याने तपास करण्याचे आदेश झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...