आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाकेबंदी:पसार आरोपींचा ड्रोनच्या मदतीने पोलिसांकडून शोध ; महाराष्ट्रासह गुजरात पोलिसाचीही शोध मोहिम सुरु

नवापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस ठाण्याचे लॉकअप तोडून फरार ६ पैकी ५ आरोपी ३५ तास उलटूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांचा ड्रोनच्या सहाय्याने शोध घेण्यात येत आहे. सोमवारी रात्री सीमावर्ती भागात तीन आरोपी पोलिसांना दिसून आले. परंतु ते पोलिसांच्या हाती लागले नाही. तर महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात पूर्ण रस्तावर नाकेबंदी केली आहे. महाराष्ट्रासह गुजरात पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

गुजरात लोकल क्राइम ब्रांच ने पकडलेला हैदर उर्फ इस्माईल पठाण याला काल संध्याकाळी गुजरात पोलिसांनी नंदुरबार पोलिसांचा ताब्यात दिले. त्याला नवापूर न्यायलयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तर नवापूर पोलिस ठाण्याचे लॉकआप सुरक्षित नसल्याने त्याला विसरवाडी पोलिस ठाण्यात ठेवल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. संपूर्ण लोहमार्ग महामार्गावर नाकाबंदी करण्यात आली आहे. बस स्थानक रेल्वे स्थानकावर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. रात्रीच्या दरम्यान आरोपी बाहेर येत असल्याने याच परिसरात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. औरंगाबादला पथक रवाना झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...