आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डागडुजी:गटार कामाचा दुसरा टप्पा होणार सुरू; रस्ते रखडणार

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील देवपूर परिसरात भूमिगत गटारीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याचे काम शहरातील पेठ, मध्यवर्ती भागात सुरू होणार आहे. त्यामुळे या भागात रस्त्यांचे काम होणार नाही फक्त डागडुजी केली जाणार आहे. शहरातील देवपूर भागात भूमिगत गटारीचे काम करण्यात आले आहे. या कामासाठी अनेक वसाहतीतील रस्ते खोदण्यात आले.

या रस्त्यांची अद्यापही दुरुस्ती झालेली नाही. आता देवपूर भागातील रस्त्यांची कामे करण्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकातही स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार काही रस्त्यांचे काम सुरू झाले आहे. आता भूमिगत गटारीच्या दुसऱ्या कामाचा टप्पा पेठ भागात सुरू होईल.त्यासाठी महापालिकेतर्फे तांत्रिक अहवाल तयार करून शासनाला जाईल. हा अहवाल मंजूर झाल्यावर निविदा प्रक्रिया होऊन कामाला सुरुवात होईल. त्यामुळे पेठ भागात रस्त्यांचे काम लांबणार आहे.

बातम्या आणखी आहेत...