आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोयाबीन शेतीमाल चोरी करणारी सराईत टोळी पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात सापडली असून, सोयाबीन तसेच वरई (भगर) असा धान्य पिकांचा ४ लाख २० हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
पिंपळनेर येथील विजय देविदास पेंढारकर यांचे धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून, त्यांचे भाईदर या गावाचा शिवारात धान्य ठेवण्याचे पत्र्याचे शेडमधून १ लाख ६२ हजारांचे २७ क्विंटल सोयाबीन, ३० हजाराची ५ क्विंटल वरई (भगर) चोरी झाली होती. रणजित योहान देसाई (वय २६, रा. बोढरिपाडा ता.साक्री) हा साथीदारांमार्फत सोयाबीन चोरी करीत असल्याची माहिती मिळाली.
त्यास ताब्यात घेतले. त्याने त्यांच्या सोबत रुवाजी गेंदा गावित (वय ४५, बोढरीपाडा), किरण ईश्वर वळवी (वय २३, रा.वार्सा ता साक्री), दावित वन्या राऊत (वय २४, नांदरखी) यांनी चोरी केल्याचे सांगितले. त्यांनाही अटक करून ४ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.ही कामगिरी पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बचावांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे, प्रवीण अमृतकर, प्रकाश सोनवणे, मनोज शिरसाठ, राकेश बोरसे, भूषण वाघ यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.