आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:वर्धा येथे गांधी दर्शन शिबिरासाठी निवड

शिरपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आर.सी.पटेल कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची गांधी दर्शन शिबिरासाठी वर्धा येथे निवड झाली. या शिबिरासाठी महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थ्यांनी आपली नावे नोंदवली होती. मात्र त्यामधून फक्त ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात महाविद्यालयातील एस.वाय बी.कॉम या वर्गातील विद्यार्थी अनुक्रमे मयूर राजेंद्र कापडे, निखिल प्रवीण शिंपी, वैशाली भास्कर माळी, जागृती संजय भामरे या चार विद्यार्थ्यांची निवड झाली असून हे शिबिर दिनांक ७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात संस्थापक डॉ. अभय बंग, पत्रकार गडचिरोली. प्रा. सुरेश द्वादशीवार, डॉ. सोमनाथ रोडे, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. टी.आर. एन. प्रभू, विश्वस्त डॉ.रवींद्र रुख्मिणी पंढरीनाथ, डॉ.जॉन चेल्लदुरे, डॉ. सी.बी.के. जोसेफ सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरांतून विद्यार्थ्यांना आश्रम जीवन अनुभव, प्रार्थना योगविद्या, समूहकार्य, मगन संग्रहालय, पवनार आश्रम, तालीम, परिसराची भेट, सूतकताई व वस्त्र, बुनाई, कृषी, गोसेवा, ग्रामाेद्योग, गोबर गॅस आदी बाबींचा अनुभव घेता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...