आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:नागपूरला होणाऱ्या नेटबॉल स्पर्धेसाठी पंच‎ म्हणून शहरातील योगेश वाघ यांची निवड‎

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर येथे होणाऱ्या नेटबॉल स्पर्धेसाठी जिल्हा हौशी‎ नेटबॉल असोसिएशनचे सचिव योगेश वाघ यांची पंच म्हणून‎ निवड झाली. त्यांचा जिल्हा क्रीडाधिकारी आसाराम जाधव,‎ जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर. व्ही. पाटील,‎ कला व क्रीडा शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष हेमंत‎ भदाणे, तालुका क्रीडाधिकारी नारायण धंदर, माजी‎ नगरसेवक विनायक शिंदे यांच्या हस्ते यांच्या हस्ते गौरव‎ करण्यात आला.

श्री.पिंपळादेवी विद्यालयाचे संचालक एस.‎ बी. पाटील, एस. डी. बाविस्कर, उपमुख्याध्यापक के. आर.‎ सावंत, पर्यवेक्षक एस. एस. पाटील, वरिष्ठ लिपिक विलास‎ बोरसे, राष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त खो-खो खेळाडू अविनाश‎ वाघ आदी उपस्थित होते. त्यांची यापूर्वी शालेय नेटबॉल‎ क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ निवडी समितीवर सदस्यपदी‎ निवड झाली होती.‎

बातम्या आणखी आहेत...