आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथदिवे बसवण्यात आले:जयनगर येथील स्मशानभूमीत स्वखर्चाने लावले पथदिवे; महात्मा फुले युवा मंचचा काैतुकास्पद पुढाकार

शहादा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जयनगर येथे स्वखर्चातून जयनगर ते उभा दगड रस्त्यालगत अमरधाम परिसरात पथ दिव्यांची व्यवस्था करण्यात आली. परिसरात नेहमी अंधार राहत असल्याने विजेच्या खांबावरून कनेक्शन घेऊन पथदिवे बसवण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच अध्यक्ष ईश्वर माळी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

जयनगर येथे ग्रामपंचायत ते अमरधाम हे ५०० मीटर अंतर असून रस्त्यावर पथ दिव्यांची व्यवस्था नव्हती. रात्री-अपरात्री, पायी शेतात जाणारे व एखाद्या वेळी रात्री अंत्ययात्रेला जाणाऱ्या लोकांना अंधारातून जावे लागत होते. त्यामुळे प्रचंड गैरसोय होत होती. त्यामुळे म.ज्याेतिबा फुले युवा मंचचे अध्यक्ष माळी यांनी स्वखर्चातून या रस्त्यावर विजेच्या दिव्यांची व्यवस्था केली. त्यामुळे ग्रामस्थांची सोय होण्यास मदत झाली आहे. यासाठी माजी उपसरपंच किशोर माळी, अनिल पाटील, प्रकाश करंजे, सुनील माळी, मोहन पारधी, चुनीलाल पाटील, लाला गोसावी, कुणाल माळी, चिंतामण गोसावी, प्रशांत गोसावी, राहुल माळी, गणेश माळी, कपिल चित्ते, राहुल सोनवणे, विनोद मोरे, सिद्धांत सोनवणे, नीलेश शुक्ल, अनिल पारधी व वैभव पाटील यांचे सहकार्य लाभले. ईश्वर माळी व सहकाऱ्यांचे काैतुक हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...