आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचूक नसतानाही एखाद्या व्यक्तीला विनाकारण रागावले जाते. हा प्रकार लक्षात आल्यावर पश्चात्ताप होतो. अशा वेळी काय करावे हे सूचत नाही. स्वतः माफी मागावी असे ठरवले तर ते काही वेळा शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेत आत्मचिंतन करून चूक सुधारण्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत आता शाळांमध्ये आत्मचिंतन पेटी बसवण्यात येईल.
पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नीटनेटकेपणा, राष्ट्रभक्ती, स्त्री-पुरुष समानता, संवेदनशीलता या दहा मूल्यांची जोपासना होते. त्याचबरोबर अहंमपणा न ठेवता रागावर नियंत्रण मिळवण्यासह स्वत: मधील दोष शोधणे आवश्यक आहे.
ते आत्मचिंतनाने शक्य होते. या पार्श्वभूमीवर आता शाळांमध्ये आत्मचिंतन पेटी ठेवण्याचे निर्देश आहे. विद्यार्थी व शिक्षकांनी या आत्मचिंतन पेटीत त्यांच्या हातून झालेली चूक कागदावर लिहून पेटीत टाकावी. या उपक्रमाच्या मागे शिक्षा करणे हा नव्हे तर चूक मान्य करत विद्यार्थ्यांना आत्मचिंतनाची सवय लावणे हा उद्देश आहे. प्रत्येक शाळेत ही पेटी दर शनिवारी उघडण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.