आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​भूमिहीन महिला भागीदारी पद्धतीने शेती कसून झाल्या आत्मनिर्भर; राज्यातील पहिलाच प्रयोग धुळ्यात यशस्वी

धुळे (अमोल पाटील )एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाबार्ड, प्रभात विकास मंचने उभे केले महिलांचे संघटन; भाडेकरारातून घेतली शेती

स्वत:कडे शेती नाही, हातमजुरी करत परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या खेड्यातील महिलांनी संयुक्त देयता समूहाच्या माध्यमातून गावातील शेती भागीदारी पद्धतीने कसत त्यातून प्रगतीकडे वाटचाल केली आहे. नाबार्डच्या सहकार्याने अर्थसाहाय्य व प्रभात विकास मंचच्या मार्गदर्शनाखाली भूमिहीन महिला शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात भागीदारी पद्धतीने होत असलेल्या शेतीचा हा पहिलाच प्रयोग यशस्वी होत आहे.

भूमिहीन महिलांना भाडेतत्त्वाने किंवा बटाईने शेती कसण्याची इच्छा असूनही पदरी पैसा नसल्याने शेती करू शकत नाहीत. नाबार्डने हीच बाब लक्षात घेत भूमिहीन व अल्प, अत्यल्प शेतकरी महिलांचे संघटन उभे केले आहे. ग्रामीण भागात भूमिहीन शेतकरी महिलांचे संयुक्त देयता समूह तयार करण्यात आले. या समूहाच्या महिलांना त्यांच्याच गावात निमबटाई, वार्षिक भाडे कराराने शेती घेण्यास प्रोत्साहित केले.

मासिक उत्पादनही वाढले
भूमिहीन, अल्प व अत्यल्पभूधारक महिला दुसऱ्याच्या शेतात मजुरी करायच्या. दिवसाला १५० ते २०० रुपये मजुरी मिळायची. स्वत:च्या शेतात भाजीपाला, कांदा, कडधान्य इतर उत्पादन घेत महिलांचे मासिक उत्पादन सात हजारांपर्यंत वाढले.

तेरा महिलांचा समूह
धुळे तालुक्यातील मोघण, न्याहळोद, गोंदूर, वार, बोरीस, देऊर, निकुंभे, खंडलाय या गावांमध्ये १३ महिला समूहांच्या माध्यमातून मौखिक, लेखी कराराने, निमबटाईने महिला शेती कसत आहेत. हा पहिलाच प्रयोग आहे.

आत्मनिर्भरचा प्रयत्न यशस्वी : या समूहाच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिलांपासून अन्य भूमिहीन महिलांनाही प्रेरणा मिळत असून, या उपक्रमात त्यादेखील सहभागी होऊ लागल्या आहेत. या माध्यमातून महिला आत्मनिर्भर होत आहे. विवेक पाटील, जिल्हा व्यवस्थापक, नाबार्ड, धुळे

बातम्या आणखी आहेत...