आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोककळा:ज्येष्ठ लेखिका सुलभा भानगावकर यांचे निधन ; अमरधाममध्ये होणार अंत्यसंस्कार

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ज्येष्ठ लेखिका, राष्ट्र सेवा दलाच्या मार्गदर्शक, धुळे एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या सुलभा शरद भानगावकर (वय. ८३) यांचे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता अल्पशा: आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या शनिवारी सकाळी नऊ वाजता एलआयसी कॉलनीतील राहत्या घरापासून निघेल. एकवीरा देवी मंदिराजवळील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

ज्येष्ठ लेखिका सुलभा भानगावकर यांचा मराठीचा गाढा अभ्यास होता. विद्यार्थी प्रिय प्राचार्या म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या लव्हेबल या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांची कोयला भई ना राख हे पुस्तक वाचनीय ठरले होते. त्यांनी स्त्री शिक्षण संस्थेचे उपाध्यक्षपद भूषवले होते. त्या घासकडबी शैक्षणिक संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन भगिनी, सहा भाचे आहे.

बातम्या आणखी आहेत...