आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृद्धांची सेवा:वृद्धाश्रमातील वृद्धांची सेवा; विद्यार्थिनींनी निराधार महिलांची केली सेवा

कापडणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आदर्श कन्या हायस्कूलमधील विद्यार्थिनींनी नगाव येथील नवजीवन विद्या विकास मंडळाच्या आनंद विहार वृद्धाश्रमाला भेट दिली. या वेळी विद्यार्थिनींनी वृद्धाश्रमातील वृद्धांची सेवा करून त्यांचे आशीर्वाद घेतले.

या वेळी विद्यार्थिनींनी वृद्ध आजी-आजोबांची विचारपूस केली. तसेच वृद्धांना जेवण देण्यासह अन्य कामे केली. वृद्धाश्रमातील आजींनी विद्यार्थिनींना जवळ घेत कौटुंबिक विचारपूस केली. तसेच नेहमी भेटायला येण्याची अपेक्षा व्यक्त केली. या वेळी विद्यार्थिनींनी भेटण्यास येण्याचा निश्चय केला. दिव्यांग शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत सवांद साधला. तन्वी बोरसे, संजीवनी पाटील, अक्षरा पाटील, अश्विनी पाटील सहभागी झाले.