आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनधारक अत्यंत त्रस्त:शहाद्यातील मोकाट गुरांचा बंदोबस्त करा; न.पा.कडे नागरिकांची मागणी

शहादा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात मोकाट गुरांचा मोठ्या प्रमाणात मनसोक्त संचार सुरू असल्याने नागरिक, वाहनधारक अत्यंत त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने या मोकाट गुरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.

शहरात मोकाट गुरांचा प्रश्न जुनाच आहे. सातत्याने हा प्रश्न शांतता कमिटी सदस्य उपस्थित करतात. मात्र अधिकारी केवळ आश्वासने देऊन मोकळे होतात. परिणामी सध्या माेकाट गुरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिवस-रात्र मोकाट गुरे सर्वत्र फिरतात. रस्त्यांच्या मध्यभागी तसेच धार्मिक स्थळे अथवा महापुरुषांच्या पुतळ्या समोरील जागेमध्ये बसतात. काही वेळा बसलेल्या गुरांची संख्या माेठी असल्याने वाहनधारकांना वाहने थांबवून मार्ग काढावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण होते.

मोकाट गुरांमुळे यापूर्वी एकाचा बळी गेल्याची घटना घडली आहे. शहरातील दोंडाईचा रस्ता, प्रेस मारुती मंदिर प्रवेशद्वारासमोर, शहादा बसस्थानकाजवळ, जुन्या तहसील कार्यालयाजवळ, महाराणा प्रताप चौक परिसरात तर रात्री कठीण परिस्थिती असते. असंख्य मोकाट गुरे रस्त्यावर बसलेले दिसतात. त्यामुळे पालिका व पोलिस प्रशासनांनी संयुक्त कारवाई करणे अपेक्षित आहे. मोकाट गुरांच्या मालकांच्या शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणीही शहरातील नागरिकांकडून हाेत आहे. मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांनी पालिका कर्मचाऱ्यांमार्फत मोकाट गुरांचा बंदोबस्त करणे अपेक्षित आहे.

बातम्या आणखी आहेत...