आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून प्रकरण:चंदनवर दाखल होते सात गुन्हे; चिनू पोपलीच्या खून प्रकरणी तिसऱ्या संशयिताचे नाव

धुळे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कुमारनगर परिसरात चिन्नू उर्फे चंदन पोपली याचा गोळी झाडून खून झाला. मृत चंदनवर मारहाण, शासकीय कामात अडथळा व गंभीर स्वरूपाचे सुमारे ७ गुन्हे दाखल होते. मुंबई येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टोळक्याशी त्याचा परिचय होता. काही दिवसांपासून तो गुन्हेगारी व गुन्हेगारांपासून लांब होता.

चिनू पोपलीच्या खून प्रकरणी तिसऱ्या संशयिताचे नाव दुपारपर्यंत समोर आले नव्हते. पोलिस दलाने निलंबित केलेल्या एका पोलिसाचे नाव चौकशीतून पुढे येते आहे. पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शींकडे चौकशी सुरू आहे.

साडेतीन हजार घेणे : भटू व यासिन यांना शनिवारी दुपारी न्यायालयात उभे करण्यात अाले. या दोघांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनवण्यात आली आहे. मृत चंदनकडे सुमारे साडेतीन हजार रुपये घेणे होते, अशी माहिती दोघा संशयितांनी दिली आहे.

वाद अन् मदत : सुमारे वर्षभरापूर्वी चौकात चंदन मध्यरात्रीपर्यंत बसला होता. विचारणा केल्यावर त्याने पोलिस अधिकारी दादासाहेब पाटील यांच्याशी हुज्जत घातली होती. विशेष म्हणजे हाच चौक अन् मध्यरात्री बाहेर राहणे चंदनच्या जीवावर बेतले. चंदनच्या खुनानंतर त्याने हुज्जत घातलेले अधिकारी पाटील हेच पथकासह मदतीला धावून आले.

रक्तबंबाळ स्थितीत गाठले घर :
गोळी झाडल्यानंतर चंदन रक्तबंबाळ अवस्थेत चौकातून घरी आला. पत्नी व कुटुंबीयांनी त्याला पाणी दिले. त्यानंतर हिरे रुग्णालयात त्याला नेले. घटनेनंतर पोलिस मारेकऱ्यांच्या शोधात होते. चंदनची माहिती घेण्यासाठी सकाळी ६ वाजता भटू व यासिन रुग्णालयात आले. या वेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

संशयित आले हाेते आधी घरी, पाठीशी होते पिस्तूल
मध्यरात्री तीन जण घरी आले होते. त्यांना तुम्ही कोण अशी विचारणा केल्यावर आम्ही इथलेच असल्याचे त्यांनी सांगितले. तिघांपैकी एकाने पाठीमागे पिस्तूलसदृश वस्तू ठेवली होते. काही वेळाने पती रक्तबंबाळ स्थितीत घरी आले. त्यांना मी व कुटुंबीयांनी पाणी दिले, अशी माहिती मृत चंदनच्या पत्नी साेनल पोपली यांनी दिली.

मध्यरात्री तीन जण घरी आले होते. त्यांना तुम्ही कोण अशी विचारणा केल्यावर आम्ही इथलेच असल्याचे त्यांनी सांगितले. तिघांपैकी एकाने पाठीमागे पिस्तूलसदृश वस्तू ठेवली होते. काही वेळाने पती रक्तबंबाळ स्थितीत घरी आले. त्यांना मी व कुटुंबीयांनी पाणी दिले, अशी माहिती मृत चंदनच्या पत्नी साेनल पोपली यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...