आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:पाणी योजनेसाठी सातबारा नावावर

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री तालुक्यातील सालटेक येथील पाणीपुरवठा योजना ज्या जमिनीचा सातबारा उतारा जिल्हा परिषदेच्या नावावर नव्हता त्या जमिनीवर झाली. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने ज्या जमिनीचा सातबारा उतारा जिल्हा परिषदेच्या नावावर असेल त्याच जमिनीवर पाणीपुरवठा योजनेचे काम करण्याचे ठरवले.

या निर्णयामुळे ४२ योजनांचे काम थांबले होते. आता मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या प्रयत्नानंतर चार जमिनींचे सातबारा उतारे जिल्हा परिषदेच्या नावावर झाले आहे. त्यामुळे योजनेचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.

आदिवासी भागातील ज्या जमिनीवर योजना होणार आहे त्या जमिनीचा सातबारा उतारा जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या नावावर नाही. त्यामुळे योजनेचे काम सुरू करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे जमिनीचा सातबारा उतारा नावावर झाल्यावरच योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यामुळे निधी मंजूर असताना व प्रशासकीय मंजुरी मिळाली तरी ४२ योजनांसाठी कार्यारंभ आदेश देता आले नव्हते. त्यामुळे ४२ योजनांच्या उद्भव क्षेत्राचा सातबारा उतारा नावावर करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहे. त्यानुसार आदिवासी क्षेत्रातील चार सातबार उतारे जिल्हा परिषदेच्या नावावर झाले आहे.

प्रति व्यक्ती ५० लिटर पाणी देण्याचा प्रयत्न
जल जीवन मिशनअंतर्गत हर घर नल से जल योजना राबवण्यात येते आहे. या योजनेंतर्गत प्रति व्यक्ती ५० लिटर पाणी देण्यात येणार आहे. त्यानुसार विविध गावात स्वतंत्र पाणीपुरवठा योजना होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...