आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट:राजवाडे मंडळाला शरद पवार यांची भेट; मंडळाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त

धुळे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथील इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशाेधन मंडळाला भेट दिली. त्यांनी मंडळाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

या वेळी राष्ट्रवादीचे खजिनदार हेमंत टकले, जिल्हा निरीक्षक अर्जुन टिळे, महानगराध्यक्ष रणजित भाेसले आदी हाेते. शरद पवार यांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष मदनलाल मिश्रा, कार्याध्यक्ष संजय मुंदडा, मुख्य चिटणीस प्राचार्य सर्जेराव भामरे यांनी केले.

या वेळी शरद पवार यांनी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९३८ मधील भेटी दरम्यान नाेंदवलेला अभिप्राय पाहिला. क्युरेटर श्रीपाद नांदेडकर यांनी छत्रपती राजाराम महाराजांची बखर, रामचंद्र अमात्यांच्या आज्ञापत्राची माहिती दिली. शरद पवार यांच्या हस्ते इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...