आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संप:महसूल कर्मचाऱ्यांचे मुंडण, संपामुळे काम ठप्प; विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांचा ४ एप्रिलपासून बेमुदत संप

धुळेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रिक्त जागा भराव्या, नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती द्यावी, पदोन्नतीसाठी सेवाज्येष्ठता यादी तयार करावी यासह विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांचा ४ एप्रिलपासून बेमुदत संप सुरू आहे. संपाच्या आठव्या दिवशी काही कर्मचाऱ्यांनी मुंडण करून शासनाचा निषेध केला. रोज टप्प्याटप्प्याने कर्मचारी मुंडण करतील. संपामुळे काम ठप्प आहे.

कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याने सोमवारी मुंडण आंदोलन झाले. आनंद चौधरी, भावसाहेब ठाकरे, गंगेश्वर गवळी, रामकृष्ण बोरसे, सुरेश सोनवणे यांच्यासह तीन-चार कर्मचाऱ्यांनी मुंडण केले. आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष मन्सुरी अन्सारी, उमेश नाशिककर, श्रीकांत देसले, सुरेश पाईकराव आदी सहभागी झाले.