आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील आदि जनता विद्या प्रसारक संस्थेच्या सुपामाय शिवराम अंतुर्लीकर प्राथमिक विद्यालय, शिवराम भीमजी अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय व सुपाबाई शिवराम अंतुर्लीकर खासगी आयटीआयमधील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण झाले. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन साहित्यिक तथा तहसीलदार आबा महाजन यांच्या हस्ते झाले.
ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर अध्यक्षस्थानी होते. आदि जनता विद्या प्रसारक संस्थेचे चेअरमन प्रा. पी. एस. अंतुर्लीकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेंद्रसिंह जमादार, उद्यान पंडित माळी गुरुजी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मोहन दयाराम सोनवणे, शिरपूरचे नगरसेवक मोहन हुलेसिंग पाटील, रमेश करनकाळ, शिरपूर साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन दिलीप पटेल, शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल, संस्थेच्या चिटणीस लीलाबाई अंतुर्लीकर, पीतांबर देवरे, अनिल उत्तमराव पाटील, सुभाष अहिरे, एम. के. भामरे, सारिका रंधे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.
नरेंद्रसिंह जमादार, विजय बागुल, शशीकांत हिंगोणेकर, सुभाष अहिरे, प्रा. पी. एस. अंतुर्लीकर यांनी मनोगत व्यक्त केले. दिनेश कोळी, चैत्राम ईशी, अभिमान शिरसाठ, हिरामण कोळी, जगन्नाथ ईशी, शांताराम सावळे,गुलाब निकुम, पीएसआय विनायक देवरे, प्रकाश शिरसाठ, रवींद्र माधवराव, मदन परदेशी आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पी. पी. शिरसाठ, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आय. पी. चव्हाण, आयटीआय कॉलेजचे प्राचार्य स्वप्निल बडगुजर यांनी प्रयत्न केले. जे. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. के. बी. लोहार यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.