आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरवस्था:शिरपूर-शहादा रस्त्यावर खड्डेच जास्त, पुलांचे कठडेही नावाला; रोज होतात अपघात, बांधकाम विभागाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

तऱ्हाडी17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश या तीन राज्यांना जोडणाऱ्या अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य महामार्गावर शिरपूर ते शहादा दरम्यान ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. रस्त्यावर इतके खड्डे आहे की चांगला रस्ता शोधावा लागतो. साइडपट्ट्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच काही पुलांचे संरक्षण कठडे नावालाच असल्याचे चित्र आहे. रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होते आहे. शिरपूर ते शहादा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनांचे स्पेअर पार्ट खराब होत असून, या रस्त्यावरून प्रवास करणे मोठे दिव्य आहे. खड्डे जास्त असल्याने दुचाकी चालवणे अतिशय कठीण आहे. तसेच अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यानंतरही बांधकाम विभाग रस्त्याची दुरुस्ती करण्यास तयार नाही. शिरपूर ते शहादा हे अंतर ५० ते ६० किमी असून, या रस्त्यावर शालेय विद्यार्थ्यांची वर्दळ जास्त असते. विशेष म्हणजे या रस्त्यावरून धुळे व नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदारांसह आमदार नेहमी जातात.

त्यानंतरही रस्त्याचे काम होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. खड्डे बुजवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणाला दिले होते का यंदा कामच दिले नाही असा प्रश्न उपस्थितीत होतो आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. यापूर्वी रस्त्यावरील खड्डे थातूरमातूर पद्धतीने बुजवण्यात आले आहे. त्यामुळे त्याच ठिकाणी वारंवार खड्डे पडतात. त्यामुळे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

मुरूम, माती टाकून नका तर थेट डांबरीकरणच करावे
शिरपूर ते शहादा व शहादा ते दोंडाईचा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शेतकरी संघर्ष समितीसह ग्रामस्थ, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आंदोलन केले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. या रस्त्यावरील खड्डे माती व मुरूम टाकून नव्हे तर डांबर टाकून बुजवण्यात यावे, अशी मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...