आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिवस साजरा:शिरपूरला विद्यार्थिनींनी सांभाळले शाळेचे कामकाज

शिरपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळेत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. या वेळी तिसरी व चौथीच्या विद्यार्थिनींनी शाळेचे कामकाज सांभाळले. चैताली गिरीश पाटीलने मुख्याध्यापिकेची भूमिका निभावली.

मुख्याध्यापिका रेखा सूर्यवंशी अध्यक्षस्थानी होत्या. मुख्याध्यापक गणेश साळुंके प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राधाकृष्णन यांच्या वेळेची शैक्षणिक प्रगती व आजची शैक्षणिक परिस्थिती यातील फरक सांगण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून काय अनुभव आले याची माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...