आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेर्चा:बेहेड-विटाई रस्त्यासाठी शिवसेनेतर्फे माेर्चा; दहा दिवसांमध्ये काम करणार

साक्री4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बेहेड-विटाई-राहुड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता महत्त्वाचा आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ३० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यानंतरही रस्त्याचे काम झालेले नाही. त्यामुळे शिवसेनेतर्फे सरपंच विशाल देसले यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच तहसीलदार प्रवीण चव्हाणके व कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, बहेड-विटाई-राहुड रस्ता दुरुस्तीसाठी ३० लाखांची निविदा प्रसिद्ध झाली आहे. पण रस्त्यावरील ३० खड्ड्यांचीदेखील डागडुजी झालेली नाही. दुसरीकडे ठेकेदाराला १५ लाख रुपये देण्यात आले आहे. रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसताना १५ लाख रुपये कसे देण्यात आले असा प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

या वेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख भूपेश शहा, माजी उपतालुका प्रमुख प्रवीण वाणी, पंचायत समिती सदस्य बाळूशेठ टाटिया, शहरप्रमुख बंडू गीते, दत्तू गुरव, युवा सेना तालुका प्रमुख बाळा देवरे, अभय शिंदे, कासारे ग्रामपंचायतीचे सदस्य बाळा खैरनार, शीतल बच्छाव, हर्षल साळुंके आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...