आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन‎:शिरपूरला राज्यपालांच्या‎ विरोधात शिवसेनेचे आंदोलन‎

शिरपूर‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज यांची थेट‎ विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी‎ यांच्याशी तुलना केल्याने शिवसेनेतर्फे‎ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध‎ करण्यात आला. त्यांच्या छायाचित्राला‎ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोडे मारले.‎ शहरातील विजय स्तंभाजवळ हे‎ आंदोलन झाले. या वेळी राज्यपालांच्या‎ विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात‎ आली. राज्यपालांनी माफी मागावी, अशी‎ मागणी करण्यात आली.

आंदोलनात‎ शिवसेनेचे भरतसिंग राजपूत, विभा‎ जोगराणा, अत्तरसिंग पावरा, योगेश‎ सूर्यवंशी, देवाजी पाटील, अभय भदाणे,‎ मंगलसिंग भोई, जितेंद्र पाटील, पिंटू शिंदे,‎ विजय चव्हाण, दिनेश गुरव, सचिन‎ चौधरी, नारायण गवळी, प्रशांत पाटील,‎ स्वप्निल जमादार, जावेद शेख आदी‎ सहभागी झाले. आंदोलनामुळे काही वेळ‎ वाहतुकीची कोंडी झाली.‎

बातम्या आणखी आहेत...