आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:शिवसेना राबवणार शिवसंपर्क अभियान, गावागावांत शाखा सुरु करण्यासाठी प्रयत्न; नियोजनासाठी शिंदखेडा येथे बैठक, कार्यकर्त्यांना जोडणार

शिंदखेडा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेतर्फे जिल्ह्यात २६ ते २९ मे दरम्यान शिवसंपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाचे नियोजन करण्यासाठी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीत गावागावात शाखा उघडणे, नवीन पदाधिकारी जोडणे, त्यांची नियुक्ती करणे, दौऱ्याचे नियोजन करणे याविषयी चर्चा करण्यात आली. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी, जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा संघटक मंगेश पवार, जिल्हा समन्वयक डॉ.भरत राजपूत, उपजिल्हाप्रमुख भरतसिंह राजपूत, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, कल्याण बागल, विभा जोगराणा, तालुकाप्रमुख गिरीश देसले, ईश्वर पाटील, अत्तरसिंग पावरा, दीपक चोरमले, विधानसभा क्षेत्र प्रमुख गणेश परदेशी, युवासेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कोळी, विश्वनाथ पाटील, छोटू पाटील, स्थानिक लोकाधिकार समितीचे हिरालाल बोरसे, शहरप्रमुख संतोष देसले, नंदकिशोर पाटील, तालुका समन्वयक विनायक पवार, उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, संतोष माळी, राजेश रूपचंदानी, एसटी वाहतूक सेनेचे आर. आर. पाटील, युवासेनेचे विजय पावरा, सागर पवार,चंद्रसिंग ठाकूर, भूषण चौधरी,अभय भदाणे, सुनील सूर्यवंशी,जितेंद्र पाटील,सुदाम येळवे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...