आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना:शिंदखेडा मतदार संघ महाविकास आघाडी झाल्यास शिवसेनेला हवा

धुळे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता कधीही विधानसभा निवडणूक होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातर्फे तयारी सुरू झाली आहे. त्यानूसार राज्यातील ४८ लाेकसभा मतदार संघासह विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला जातो आहे. त्यानुसार धुळे जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. आगामी निवडणूक महा विकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्यास शिंदखेडा विधानसभा मतदार संघ शिवसेनेला द्यावा, अशी मागणी या वेळी झाली.

मुंबईत मातोश्री येथे ही बैठक झाली. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे सचिव तथा खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख बबन थोरात आदी उपस्थित हाेते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धुळे लोकसभा मतदार संघात समाविष्ट विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. सदस्य नोंदणी, मतदार नोंदणी, बुथ प्रमुख रचनेची माहिती घेतली.

या वेळी सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, प्रा. शरद पाटील, महानगर प्रमुख ङाॅ. सुशील महाजन यांनी अहवाल सादर केला. संपर्कप्रमुख अतुल श्रीवर्धनकर, अनिल ढेरे, सुनिल पाटील, सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी, ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, कैलास पाटील, ज्योती पाटील, मंगेश पवार, शानाभाऊ सोनवणे आदी उपस्थित होते.

शिंदखेड्यात पूर्वी शिवसेनेला मिळालेले होते यश
युतीच्या काळात शिंदखेडा हा शिवसेनेचा मतदार संघ भाजपला देण्यात आला. या मतदार संघातून शिवसेनेचा जिल्ह्यातील पहिला आमदार निवडून आला होता. त्यामुळे महा विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुक लढवली गेली तर या मतदार संघातून शिवसेनेचा आमदार निवडून येईल. त्यामुळे हा मतदार संघ शिवसेनेला मिळावी अशी मागणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हेमंत साळुंखे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...