आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात दहा ते बारा दिवसाआड पाणी मिळते. त्यामुळे भाजपला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. मनपाच्या पाणीपुरवठा केंद्रावर एक्स्प्रेस फीडर आहे. त्यामुळे भारनियमनामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊ शकत नाही. शिवसेनेने केलेल्या आंदोलनामुळे शहरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन होते आहे. हे आश्वासन पाळले नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला.
शिवसेनेने कावड मोर्चा काढल्यावर मनपा आता कामाला लागली आहे. अपयश लपवण्यासाठी महापौर प्रदीप कर्पे यांनी भारनियमनाचे कारण देत महाविकास आघाडीकडे बोट दाखवतात. पण मनपाने एक्स्प्रेस फीडरवरून वीज जोडणी घेतली आहे. त्यामुळे महापौरांचा आरोप हास्यास्पद आहे. तसेच उन्हाळा सुरू झाल्यावर तीन महिन्यांनी जलवाहिन्या दुरुस्तीचे काम सुरू झाले.
त्यामुळे सत्ताधारी पाणीप्रश्नी किती गंभीर आहे हे दिसून येते. शहरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा करावा तसे झाले नाही तर आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेचे महानगरप्रमुख मनोज मोरे, जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख सतीश महाले आदींनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.